What is bill of exchange (हुंडी म्हणजे काय)
Definition of bill of exchange (हुंडी ची व्याख्या काय आहे)
व्यवसायामध्ये सर्वच व्यवहार cash मध्ये होत नाहीत बऱ्याच वेळा ते उधारीवर होत असतात. Goods उधारीवर घेताना किंवा विकताना एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला एक Legal document वर एक प्रकारचे वचन
(Promise) लिहून देतो की, 'आजपासून . . . . . या दिवशी मी आपल्याला रु. . . . . . एवढी रक्कम . . . . . मालापोटी देईन' अश्या प्रकारच्या Promissory Note ला Bills of Exchange असे म्हणतात.
मराठीत याला 'हुंडी' असे म्हणतात. जर हुंडी देणाऱ्या व्यापाऱ्याने ठरलेल्या दिवशी Payment केले नाही तर हुंडी घेणारा व्यापारी हा Promise करणाऱ्या व्यापाऱ्यावर न्यायालयीन कार्यवाही करू शकतो.
Bill of Exchange एका व्यापाऱ्यासाठी "Bill Receivables" आहे तर दुसऱ्या व्यापाऱ्यासाठी "Bills Payable" आहे. ज्या व्यापाऱ्याला हे promissory document मिळत असते तो याला "Bill Receivables" म्हणतो तर जो व्यापारी असे Promissory document देत असतो तो याला "Bills Payable" असे म्हणतो.
Business मध्ये येणाऱ्या Bill of Exchange ला "Bill Receivables" असे Accounts असते तर Business मधून जाणाऱ्या Bill of Exchange ला "Bill Payable" असे Accounts असते. ही दोन्ही Accounts Real Accounts Type मध्ये येतात.
आता आपण Bill of Exchange चे उदाहरण (Example) पाहू
१) Received Bill of Exchange of Rs. 10000/- from "A".
या Transaction ची एक नोंद Bill Receivables या account ला तर दुसरी नोंद 'A' च्या account ला होईल. Bill Receivables हे Real Account आहे. Bill Receivables आपल्याला मिळत आहे. म्हणून Real Accounts च्या नियमानुसार "Debits whats comes in" नुसार Bill Receivables a/c ला Debit होईल. तर 'A' चे a/c हे Personal Account आहे व तो Bill of Exchange चा Giver (देणारा) आहे. त्यामुळे Personal Account च्या नियमानुसार "Credit the giver" त्यामुळे 'A' चे a/c Credit होईल.
Journal Entry खालील प्रमाणे होईल
Date Particulars Dr/Cr Debit Amt Credit Amt.
01-04-20 Bills Receivable a/c Dr 10000
01-04-20 To A's a/c Cr 10000
२) Issued Bill of Exchange to B for Rs. 15000/-
या Transaction ची एक नोंद Bill Payable या account ला तर दुसरी नोंद 'B' च्या account ला होईल. Bill Payable हे Real Account आहे.
Bill Payable आपल्याकडून जात आहे. म्हणून Real Accounts च्या नियमानुसार "Credit whats goes out" नुसार Bill Payable a/c ला Credit होईल. तर 'B' चे a/c हे Personal Account आहे व तो Bill of Exchange चा receiver (घेणारा) आहे.
त्यामुळे Personal Account च्या नियमानुसार "Debit the Receiver" त्यामुळे 'B' चे a/c Debit होईल.
Journal Entry खालील प्रमाणे होईल
Date Particulars Dr/Cr Debit Amt Credit Amt.
01-04-20 B's a/c Dr 15000
01-04-20 To Bills Payable a/c Cr 15000
Comments