Account म्हणजे काय ?
" Account (खाते ) is a systematically kept Record of every item, related to Business"
Accounting करत असताना Business चा पूर्ण Profit/Loss कळावा, यासाठी बिझनेस शी संबंधित अशा
सर्व वस्तूंची, व्यक्तींची, व खर्चाची तसेच उत्पन्नाची नोंद ठेवणे म्हणजे "Accounts" ठेवणे होय.
Accounting करत असताना काही Concepts वापरल्या जातात त्या खालील प्रमाणे -
१. Business Transaction (व्यापारी व्यवहार) :- अनेक Transaction चा मिळून Business बनतो. उदाहरणार्थ - माल विकत घेतला, माल विकला, पैसे आले, पैसे दिले ह्या सर्व घटनांना आपण व्यवहार असे म्हणतो.
पण प्रत्तेक Transaction हे Business Transaction आहे असे नाही.
"Business Transaction म्हणजे व्यापाराशी संबंधित व व्यापाराच्या Profit/Loss वर थेट परिणाम करणारे एखादे Transaction"
याला एका उदाहरणावरून समजून घेऊ
Piyush appointed as an accountant किंवा Order placed for goods etc.
पहिल्या उदा. piyush या व्यक्तीला accountant म्हणून नोकरी दिली, तर त्याचा directly business वर काहीही परिणाम होत नाही, म्हणजे आपण पीयूष ला नोकरी दिली,
याचा businessच्या Profit किंवा Loss वर काहीही परिणाम करीत नाही म्हणून याची नोंद (Accounting) करू शकत नाही.
असेच दुसऱ्या उदाहरणात मालाची फक्त Order दिली आहे त्या मालासाठी पैसे हि दिलेले नाहीत किंवा मालही आपल्याकडे आलेला नाही, त्यामुळे याचा थेट परिणाम Business च्या Profit/Loss वर होत नाही म्हणून याचीहि नोंद (Accounting) करू शकत नाही.
२. Cash Transaction (रोकड व्यवहार) :- एखादे Business Transaction जसे Assets किंवा Goods विकत घेताना किंवा विकतांना जर Cash (पैसे) घेऊन / देऊन व्यवहार झाला असेल तर त्या व्यवहाराला Cash Transaction (रोकड व्यवहार असे म्हणतात.
३. Credit Transaction (पट व्यवहार ) :- एखादे Business Transaction जसे Assets किंवा Goods विकत घेताना किंवा विकतांना जर उधारीवर घेतले / दिले असतील तर त्या व्यवहाराला Credit Transaction (पत व्यवहार) असे म्हणतात.
४. Goods (माल) :- व्यापारामध्ये Regularly व Mainly खरेदी केली जाणारी आणि विकली जाणारी वस्तु म्हणजे Goods होय.
Business चा मुख्य हेतु हा Profit कमावणे हा असतो आणि तो Goods (माल ) च्या खरेदी विक्रीवर अवलंबून असतो.
उदा. एखाद्या दुधविक्रेत्याच्या दृष्टीने दूध हे त्याचे Goods (माल ) म्हणजेच दुधविक्रेत्याने जर दूध विकत घेतले किंवा दुसऱ्याला विकले तर त्याने माल विकत घेतला किंवा विकला असे म्हणत येईल.
तसेच एखाद्या फळविक्रेत्याच्या दृष्टीने सफरचंद, चिकू, आंबे ईत्यादी फळे हि त्याच्या व्यवसायाच्या दृष्टीने Goods (माल) होईल. परंतु जर फळविक्रेत्याने फळे विकण्यासाठी हातगाडी खरेदी केली तर मात्र त्याने माल खरेदी केला असे होणार नाही कारण त्या फळविक्रेत्याचा मुख्य व्यवसाय फळाच्या खरेदी विक्रीचा आहे. हातगाडी खरेदी विक्रीचा नाही.
५. Assets (मालमत्ता) :- Assets म्हणजे Business साठी आवश्यक असणाऱ्या किंवा Business ला सहाय्यक ठरणाऱ्या अश्या Valuable व Realizable (अडचणीच्या वेळी Assets विकून पैसे मिळवता येण्याजोग्या) वस्तु.
उदा. फळविक्रेत्याने फळे विकण्यासाठी घेतलेली हातगाडी हि त्याच्या दृष्टीने एक प्रकारची मालमत्ता आहे. Note:- Goods (माल) व Assets (मालमत्ता) या Concepts मध्ये फरक आहे जरी Goods हि विकता येत असले व Assets हि विकता येत असल्या, तरी Goods रोज विकले जातात व Assets एखादयावेळी विकल्या जातात.
६. Liabilities (देणी) :- Liabilities म्हणजे आपल्या Business ने इतरांना द्यावयाच्या देणी. जसे बँकेकडून घेतलेले loan, उधारीवर खरेदी केलेला माल (Supplier Liability),Interest Payable, Liability हे नेहमी Balance Sheet च्या डाव्या बाजूला दाखवतात.
७. Capital (भांडवल) :- Capital (भांडवल ) म्हणजे Business च्या मालकाने Business सुरू करण्यासाठी केलेली गुंतवणूक. Business चा मालक business चे capital म्हणून Cash, Goods किंवा Assets अशी कोणतीही गोष्ट गुंतवू शकतो.
Note:- Accountancy मध्ये Capital म्हणजे Business सुरू करण्यासाठी Business ला दिलेले एक प्रकारचे कर्ज म्हणून ओळखले जाते व तो business त्या मालकाला तेवढे पैसे देणं आहे असे समजले जाते. म्हणून Capital हे नेहमी बिझनेस ची Liability समजली जाते.
८. Debtors (देणेकरी) :- आपल्या Business ला ज्या व्यक्ति किंवा संस्था काही रक्कम देणे असतात, अशा व्यक्तिंना Debtors (देणेकरी) असे म्हणतात. (शुद्ध मराठीत याला 'ऋणको' असे म्हणतात). Debtors हे नेहमी Assets म्हणून Treat केले जातात.
९. Creditors (घेणेकरी) :- आपला Business ज्या व्यक्ति किंवा संस्थांना काही रक्कम देणं असतो अशा व्यक्ति किंवा संस्थांना Creditors असे म्हणतात. (शुद्ध मराठीत याला 'धनको' असे म्हणतात). creditors हे नेहमी Liabilities म्हणून Treat केले जातात.
Comments